कोकण रेल्वेच्या डबल डेकर ट्रेनचे वेळापत्रक बदलणार : गुप्ता

कोकण रेल्वेने सुरु केलेली डबल डेकर ट्रेनला अधिक चांगला प्रतिसाद मिळणासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती कोकण रेल्वेचे नवीन अध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.

Updated: Feb 6, 2016, 09:25 AM IST
कोकण रेल्वेच्या डबल डेकर ट्रेनचे वेळापत्रक बदलणार : गुप्ता title=

नवी मुंबई : कोकण रेल्वेने सुरु केलेली डबल डेकर ट्रेनला अधिक चांगला प्रतिसाद मिळणासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती कोकण रेल्वेचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली.

त्याचवेळी कोकण रेल्वेने सुरु केलेली डबल डेकर ट्रेन कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नसल्याचे संजय गुप्ता म्हणालेत. डबल डेकर ट्रेनमध्ये प्रवाशांची सख्या वाढावी यासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

नुकतीच संजय गुप्ता यांची कोकण रेल्वेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणामुळं ट्रेनचा वेग वाढणार आहे. त्यामुळं प्रवाशांची संख्या वाढवण्याचा मानस गुप्ता यांनी व्यक्त केलाय.