शिर्डीतील साईबाबांचे ११ वरदान

शिर्डीच्या साईमंदिरावर देशभरातील भक्तांची मोठी श्रद्धा आहे, साईबाबांच्या शिर्डीत अशा ११ गोष्टी आहेत. ज्या केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. जर शिर्डीला जाऊन तुम्हाला अकरा वरदान प्राप्त करायचे असतील तर, शिर्डीच्या साईबाबांच्या ११ स्थानांविषयी माहिती घेणे आवश्यक आहे.

Updated: Sep 14, 2015, 12:58 PM IST
शिर्डीतील साईबाबांचे ११ वरदान title=

दिल्ली : शिर्डीच्या साईमंदिरावर देशभरातील भक्तांची मोठी श्रद्धा आहे, साईबाबांच्या शिर्डीत अशा ११ गोष्टी आहेत. ज्या केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. जर शिर्डीला जाऊन तुम्हाला अकरा वरदान प्राप्त करायचे असतील तर, शिर्डीच्या साईबाबांच्या ११ स्थानांविषयी माहिती घेणे आवश्यक आहे.

शिर्डीमध्ये सुखी जीवनाचं वरदान
शिर्डीच्या साई मंदिरात गुरूवारी आणि शुक्रवारी रात्री धूप, लोबान, अगरबत्ती लावा.

शिर्डीत मिळेल धन-संपत्ती
नंदादीप किंवा लेंडीबागमध्ये तेल किंवा तुपाचा दिवा लावल्याने घरात धन-संपत्ती येते.

शिर्डीमध्ये मिळेल प्रमोशन
समाधी दर्शनानंतर गरीबांना जेवण दिल्यास, किंवा खाण्याच्या वस्तू वाटल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात मोठी प्रगती दिसून येते.

शिर्डीत होतील आजार दूर
साई प्रसादालयात साईंकडून चांगलं आरोग्य मिळण्याची प्रार्थना केल्यास आरोग्यात सुधारणा होते.
 
शिर्डीत आल्याने शत्रुत्व कमी होईल
बाबांच्या समाधीजवळ कुणाचीही निंदा केली नाही तर, तुमचे शत्रु कमी होतील.

शिर्डीत होईल भय दूर
जर तुमच्या मनात भय घर करत असेल, गुरूवारी रात्री 09.15 पासून रात्री १० पर्यंत पालखी समारोह पाहा, चॉकलेट-बिस्किट वाटल्याने तुमचं भय दूर होईल. 

शिर्डीत सर्व मनोकामना पूर्ण होतील
बाबांचा धर्म ग्रंथ आणि साई साहित्य द्वारकेला जाऊन रात्री वाचा, आरतीची पुस्तकं भक्तांना वाटा

शिर्डीमध्ये मिलेगी नोकरी 
मंदिरात श्री विष्णू सहस्त्र नामाचं पठन करा, असं केल्याने तुम्हाला नोकरी मिळेल, कारभारात फायदा होईल.

खोट्या दाव्यांपासून मुक्ती
खंडोबा मंदिरात प्रार्थना करा, येथे उभे असलेले बाबा मनमोहक दिसतात.

शिर्डीत प्रत्येक समस्येचं समाधान
सर्वप्रथम गुरूस्थानावर आपली समस्या लिहून बाबांसमोर वाचा, दुसऱ्यांदा येण्याचं वचन द्या, असं केल्याने सर्व समस्या दूर होतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.