डोंबिवली : प्रोबेस कंपनीत झालेला स्फोट हा बॉयलरचा नसून केमिकल रिअॅक्टरचा झाल्याचं स्पष्ट झालंय.
महाराष्ट्र सरकारचे डायरेक्टर ऑफ स्टीम बॉयलरच्या निरीक्षणानंतर हे स्पष्ट झालंय. या परीक्षणादरम्यान कंपनीत बॉयलरच नसल्याचं उघडकीस आलंय.
प्रोबेस कंनीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तर केमिकल रिअॅक्टरमुळे झाल्याची माहिती एमआयडीसीचे ऑफिसर दिलीप गुंड यांनी दिली. मात्र केमिकल रिअॅक्टरचा स्फोट कशामुळे झाला हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.