व्हिडिओ : डोंबिवलीत पोलिसांचं बारबालांसोबत अश्लील नृत्य

डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिस ठाण्यातले दोन कॉन्स्टेबल बारबालांसोबत अश्लिल कृत्य करत असल्याचं समोर आलंय. याची व्हिडिओ क्लिपच 'झी मीडिया'च्या हाती लागलीय.

Updated: Apr 17, 2015, 01:34 PM IST
व्हिडिओ : डोंबिवलीत पोलिसांचं बारबालांसोबत अश्लील नृत्य title=

डोंबिवली : डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिस ठाण्यातले दोन कॉन्स्टेबल बारबालांसोबत अश्लिल कृत्य करत असल्याचं समोर आलंय. याची व्हिडिओ क्लिपच 'झी मीडिया'च्या हाती लागलीय.

रशीद मुलानी आणि संजय बाबर अशी या दोन कॉन्स्टेबलची नावं आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात सध्या या क्लिपची जोरदार चर्चा आहे. डान्सबारवर बंदी असताना आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी छमछम सुरूच आहे. 

या डान्सबारना पोलिसांचा केवळ आशीर्वादच नव्हे, तर स्वतः पोलीस बारबालांसोबत ठुमके लावण्यात मग्न असल्याचंही धक्कादायक चित्र समोर आलंय. डोंबिवलीतल्या इंद्रप्रस्थ बारमधील ही व्हिडिओ क्लिप आहे. 

खळबळजनक बाब म्हणजे याची चर्चा झाल्यानंतर मुलानी आणि बाबर यांच्यावर केवळ बदलीची जुजबी कारवाई करण्यात आलीय. यामागे अर्थपूर्ण संबंध असल्याचं बोललं जातंय.

व्हिडिओ पाहा -

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.