उल्हासनगरमध्ये भटका कुत्रा 10 मुलांना चावला

उल्हासनगर शहरातील साईनाथ कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्याने 10 लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Dec 13, 2016, 07:35 PM IST
उल्हासनगरमध्ये भटका कुत्रा 10 मुलांना चावला title=

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील साईनाथ कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्याने 10 लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात पाच मुलं गंभीररित्या जखमी झाली असून त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर पाच मुलांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी नेण्यात आलं. उल्हासनगर शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून गेल्या 7 महिन्यात 7862 रुग्णांनी कुत्रा चावल्याने मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेतलेत. तर दिवसाला 60 ते 70 कुत्रा चावल्याचे रुग्ण येत असल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे.