सदाभाऊ खोतांची आबांवर असभ्य टीका!

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना विरोधकांवर टीका करताना नेत्यांचा तोल ढळू लागल्याचं दिसतंय. बुलडाणा जिल्ह्यात उंद्री इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची ‘साडेतीन फुट्या’ असा उल्लेख करून टीकेची खालची पातळी गाठलीये.

Updated: Aug 26, 2014, 12:17 PM IST
सदाभाऊ खोतांची आबांवर असभ्य टीका! title=

बुलडाणा: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना विरोधकांवर टीका करताना नेत्यांचा तोल ढळू लागल्याचं दिसतंय. बुलडाणा जिल्ह्यात उंद्री इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची ‘साडेतीन फुट्या’ असा उल्लेख करून टीकेची खालची पातळी गाठलीये.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या एल्गार रथयात्रेचा समारोप काल झाला. यावेळी खोत यांनी आर. आर. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसूख घेतलं. अत्यंत असभ्य भाषेत खोत यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांची निर्भत्सना केलीये.

टीका करतांना आर.आर.पाटील हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना अशाप्रकारे बोलणं किती योग्य आहे? ‘साडेतीन फुट्या’ म्हणत तुझं तोंड माझ्या ढुंगणाला लागतंय, अशी असभ्य टीका खोत यांनी केलीय.

दरम्यान, १२ जागा दिल्या नाहीत तर महायुतीच्या बाहेर पडू असा निर्वाणीचा इशाराही स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.