औरंगाबादेत दोन वृद्ध महिलांची हत्या

भरदिवसा दरोडा आणि हत्येच्या घटनांनी औरंगाबाद हादरलंय. औरंगाबादच्या सिडको भागात चोरीच्या उद्देशानं 60 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या कऱण्यात 

Updated: Dec 2, 2015, 10:39 PM IST
औरंगाबादेत दोन वृद्ध महिलांची हत्या title=

औरंगाबाद : भरदिवसा दरोडा आणि हत्येच्या घटनांनी औरंगाबाद हादरलंय. औरंगाबादच्या सिडको भागात चोरीच्या उद्देशानं 60 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या कऱण्यात 

आलीय, तर वाळूज भागातही 67 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून खून कऱण्यात आलाय. त्यामुळं वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

सिडको एन नाईन भागातली विमल ज्योतीगृह निर्माण सोसायटी खून आणि दरोड्याच्या घटनांनी हादरलीय. भरदिवसा उच्चभ्रू वसाहतीत चित्रा डकरे या महिलेची
गळा चिरून हत्या झालीय. चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाल्याचा संशय आहे. 

सकाळी अकराच्या सुमारास चोरट्यांनी घराची बेल वाजवून घरात प्रवेश केला. त्याआधी चोरट्यांनी आजूबाजूच्या फ्लॅटचे कडीकोंडेही बाहेरून लावले आणि त्यानंतर महिलेचे 

हात बांधून तिची हत्या केली. घरातले लोक बाहेर गेले असल्यामुळं ही महिला घरात एकटीच होती. घरात कपाटाजवळ मिरची पूड, दोरी आणि इतर साहित्य सापडलंय.

वाळूज भागात तर गच्चीवर झोपलेल्या 67 वर्षीय सखुबाई महाजन यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आलीये. हत्येनंतर त्यांच्या अंगावरील दागिने आणि रोख 

रक्कम घेवून चोरटे पसार झाले. गेल्या दोन महिन्यातील भरदिवसा चोरीच्या आणि वृद्धांवर हल्ला झाल्याची ही चौथी घटना आहे. त्यामुळं आधीच्या घटनांचा उलगडा केला 

नसलेल्या पोलिसांसमोर हे नवं आव्हान उभं राहिलंय.

औरंगाबादमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतेय. गेल्या काही दिवसांपासून सेल्समन म्हणून आलेल्या तरूणांनी भरदिवसा दरोडे घातलेल्या घटना ताज्या आहेत, 

त्यातच मंगळसूत्र चोरांनाही आळा घाळण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांमुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.