पाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून एका १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या चिखली इथल्या घरकुल प्रकल्पातील कुलस्वामी हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडलीय. 

Updated: Jul 16, 2014, 09:08 PM IST
पाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू title=

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून एका १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या चिखली इथल्या घरकुल प्रकल्पातील कुलस्वामी हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडलीय. 

सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडलीय. निकिता चंद्रकांत निसर्गंध असं मृत मुलीचं नाव आहे. निकीता सकाळी अकराच्या सुमारास बालकनीत कपडे वाळत घालत होती. त्याचवेळी तिचा तोल जावून ती पाचव्या मजल्यावरुन खाली पडली, असल्याच पोलिसांनी सांगितलंय. 

निकिता कालपासूनच आजारी असल्यान ती शाळेत गेली नव्हती. ती गच्चीमध्ये कपडे वाळात घालत असताना तिचा तोल गेला आणि ती पाचव्या मजल्यावरून खाली कोसळली. दीड महिन्यापूर्वीच ते या ठिकाणी रहायला आलेत. नवीन घरात राहायला आल्याचा आनंदात असलेल्या या कुटुंबावर निकीताच्या मृत्यूमुळं दुःखाचा डोंगर कोसळलाय. 

निकिता घरात एकटीच असल्यानं तिच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळं सर्व बाजू लक्षात घेऊन पुढील तपास सुरूच ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.