नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी ३ वर्षानंतर आरोपपत्र दाखल

डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येला तब्बल तीन वर्ष उलटल्यावर सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. पुणे सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून सीबीआयनं वीरेंद्र तावडे हाच प्रमुख सूत्रधार असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. याप्रकरणी विनय पवार आणि सारंग आकोलकर यांनाही आरोपी करण्यात आलंय. हे दोघेही सध्या फरार आहेत.

Updated: Sep 7, 2016, 03:44 PM IST
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी ३ वर्षानंतर आरोपपत्र दाखल title=

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येला तब्बल तीन वर्ष उलटल्यावर सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. पुणे सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून सीबीआयनं वीरेंद्र तावडे हाच प्रमुख सूत्रधार असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. याप्रकरणी विनय पवार आणि सारंग आकोलकर यांनाही आरोपी करण्यात आलंय. हे दोघेही सध्या फरार आहेत.