पिंपरी-चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, गुंडांची तोडफोड सीसीटीव्हीत कैद

पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. चिखली शाहूनगर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १० ते १२ तरुणांच्या टोळक्यानं हैदोस घातला. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दगडफेक करत या गुंडांच्या टोळक्यानं तोडफोड केलीय.

Updated: Oct 28, 2015, 12:38 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, गुंडांची तोडफोड सीसीटीव्हीत कैद title=

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. चिखली शाहूनगर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १० ते १२ तरुणांच्या टोळक्यानं हैदोस घातला. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दगडफेक करत या गुंडांच्या टोळक्यानं तोडफोड केलीय.

या घटनेत २५ पेक्षा अधिक वाहनांचं नुकसान झालंय. या गुंडांनी यावेळी काही दुकानांनाही लक्ष्य केलंय. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी प्रतिकार करण्यासाठी गेलेले नागरिक आणि पोलिसांवरही या गुंडांनी हल्ला केलाय. या गुंडांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. अशाप्रकारची गेल्या १५ दिवसातली ही तिसरी घटना आहे. 

आणखी वाचा - मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शुल्लक कारणावरून तलवारीने हल्ला

त्यामुळं वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळं पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलंय. पोलिसांनी या प्रकरणी ९ जणांना ताब्यात घेतलंय.

पाहा व्हिडिओ - 

 

 

आणखी वाचा - ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.