नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्येबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय. केनियात गाईचं रक्त पितात. मात्र गायीची हत्या केली जात नाही असं भागवत यांनी म्हटलंय. केनियात गोहत्या बंदी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अधिक वाचा - विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक : मोहन भागवत
नागपुरातील आर. एस. धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात 'आयसीसीएस'च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्) संयुक्त विद्यमानं 'प्राचीन भारतीय संस्कृतीचे जगातील प्रतिध्वनी' या विषयावर शनिवारपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी मुख्य अतिथी म्हणून डॉ. भागवत बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गोहत्याबंदीचं समर्थन केलंय.अफ्रिकेतील देशांत हलाखीच्या परिस्थितीत गायीचं रक्त प्राशन करण्यात येतं, परंतु त्या बदल्यात तिचं पोषण करण्यात येतं. गाईला मारणं तिथंही पाप समजलं जातं, अशा शब्दांत त्यांनी गोहत्याबंदीवर भाष्य केलं.
अधिक वाचा - शिवसेनेचे कान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टोचले
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.