धुळे नंदुरबार : स्थानिक विधान परिषद निवडणुकीत उमदेवार अमरीश पटेल यांनी बाजी मारली आहे.
पटेल यांना विक्रमी ३५२ मतं मिळाली असून युतीचे उमेदवार डॉ. शशिकांत वाणी यांना फक्त ३१ मतं मिळाली आहेत. एकूण ३९५ मतदानापैंकी ३९२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैंकी २ जणांनी नोटाला मतदान केले होते तर ७ मत बाद ठरविण्यात आली.
अधिक वाचा - मुंबई विधानपरिषदेच्या जागांवर कदम आणि जगताप!
विशेष म्हणजे, भाजपला युतीची मत मिळाली नाहीत असेच म्हणावे लागेल. कारण वाणी यांना भाजपला स्वताच्या पक्षाचे ३७ मतही मिळाली नाहीत. सेनेनेही भाजप उमेदवाराला मत दिले नाहीत.
सेना भाजप मिळून ५७ मत भाजप उमेदवाराला मिळायला होती मात्र प्रत्यक्षात फक्त ३१ मत मिळाल्याने भाजपला सेने साथ तर दिलीच नाही सोबत स्वपक्षीयांही ठेंगा दाखवलं. कॉंग्रेस उमेदवार पटेल याना मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, सेना आणि काही भाजपच्या सदस्यांनीही मतदान केल्याचं दिसून आलं.