जळगाव : वादग्रस्त जमीन प्रकरणी गिरीश महाजनांविरोधात आता जळगावमध्ये वातावरण तापू लागलंय. राष्ट्रवादीने या विरोधात आंदोलन छेडलेय.
महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. महाजन यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली केल्यामुळं त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली.
जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातील मानपूरमध्ये २००१ साली गिरीश महाजन यांनी कारखान्याच्या नावाखाली जमीन घेतली. मात्र या जमिनीचा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही. त्यामुळे त्यांनी फसवणूक केल्याचे राष्ट्रवादीने म्हटलेय. याची चौकशी होऊन त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आलेय.