राज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका

बारामतीकरांमुळे राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामिण क्षेत्रातील प्रगतीचा खेळ खंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद,कृषीखाते,पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही. 

Updated: Sep 7, 2015, 04:14 PM IST
राज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका  title=

शिर्डी: बारामतीकरांमुळे राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामिण क्षेत्रातील प्रगतीचा खेळ खंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद,कृषीखाते,पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही. मराठवाड्यात कायमचा दुष्काळ कसा राहील याचं नियोजन बारामतीकरांनी मोठ्या खुबीनं केलं असल्याची टिका काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी पवारांचं थेट नाव न घेता केली आहे.

आणखी वाचा - दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन

बारामतीच्या भागातील ऊसाला पाणी कमी पडू नये यासाठी बाराशे कोटी रुपयांचा भिमा स्थिरीकरण प्रकल्प हाती घेतला. तो पैसा गोदावरी खोऱ्यासाठी वापरला असता तर मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटला असता, असंही विखे पाटील म्हणाले. 

बारामतीकर भांडणं लावून देण्यात पटाईत. पाण्यावर दुष्काळावर राजकारण करु नका म्हननारेच काय करतात असा सवालही विखेंनी केलाय. बारामतीकरांच्या पक्षात न्याय देण्याचं धोरणच नाही. टगेगिरीचं राजकारण करणाऱ्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न का सोडवला नाही? टगेगिरी करणाऱ्यांवर मोर्चे काढण्यांची वेळ का आली? या शब्दात अजित पवारांवरही विखे पाटलांनी टिकास्त्र सोडलं. 

आणखी वाचा - शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफी करा : शरद पवार

महाराष्ट्रातील हा दुष्काळ भयावह आहे सरकारनंच फक्त दिलासा देण्याची नाही तर सगळ्यांनी मदत करण्याची गरज, तर काही लोक घाबरवून सोडतायेत. शरद पवार हेच पाणी प्रश्नाला जबाबदार आहे. राजकारण करुन पोळी भाजण्याचं त्यांचं काम आहे, अशी सडकून टिका विखे पाटलांनी केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.