नारायण राणेंना सिंधुदुर्गात मर्यादित यश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या काँग्रेसला सिंधुदुर्गातील नगरपालिकांच्या निवडणुकीत मर्यादित यश मिळालेय. तर दुसरीकडे दीपक केसरकरही निर्भेळ यश मिळवू शकलेले नाही.

Updated: Nov 28, 2016, 02:20 PM IST
नारायण राणेंना सिंधुदुर्गात मर्यादित यश title=

सिंधुदुर्ग : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या काँग्रेसला सिंधुदुर्गातील नगरपालिकांच्या निवडणुकीत मर्यादित यश मिळालेय. तर दुसरीकडे दीपक केसरकरही निर्भेळ यश मिळवू शकलेले नाही.

सावंतवाडी नगरपालिकेत काँग्रेसला 8 जागा, शिवसेनेला 7, भाजप 1 , राष्ट्रवादी काँग्रेस 1 तर अपक्ष एक जागा मिळालीये. शिवसेनेचे बबन साळगावकर नराध्यक्षपदी निवडून आलेत. 

वेंगुर्ला नगरपालिकेत शिवसेनेला केवळ एक जागा मिळालीये तर भाजपला 6, काँग्रेसला 7, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्षला 2 जागा मिळाल्यात. भाजपचे राजन गिरप नराध्यक्षपदी निवडून आलेत.

मालवणमध्ये शिवसेना भाजपला प्रत्येकी 5, काँग्रेसला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि 1 अपक्ष निवडून आलेत. शिवसेनेचे महेश कांदळकर नगराध्यक्षपदी निवडून आलेत.

देवगडमध्ये शिवसेनेला केवळ एक जागा मिळालीये. भाजपला 4, काँग्रेसला 10, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 तर अपक्ष 1 जागेवर विजयी झालेत.