कॉलेजवयीन मुले व्यसनाधीन, कोल्हापुरात अभिनव आंदोलन

३१ डिसेंबरच्या दिवशी अनेक जण बेधुंद होवून व्यसन करत असताना सर्रास दिसतात.  

Updated: Dec 31, 2015, 10:22 PM IST
कॉलेजवयीन मुले व्यसनाधीन, कोल्हापुरात अभिनव आंदोलन  title=

कोल्हापूर : ३१ डिसेंबरच्या दिवशी अनेक जण बेधुंद होवून व्यसन करत असताना सर्रास दिसतात. यामध्ये कॉलेजवयीन मुलांची संख्या सर्वात जास्त असते. त्यामुळं व्यसनाधीनतेकडं झुकणाऱ्या या मुलांना बाहेर काढण्यासाठी आज कोल्हापुरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

अंनिसनं कोल्हापुरातल्या कॉमर्स कॉलेजमधील तरुण मुलांना व्यसनाधिनतेकडं झुकू नका असा संदेश दिला. त्याचबरोबर दारुऐवजी दूध प्यायलात तर शरीर अधिक बळकट होतं असं सांगत कॉलेजच्या मुलांना दुधाचं वाटप करण्यात आलं. 

यावेळी विद्यार्थांनी दारु बाटलीच्या पोस्टरला चप्पल मारो आंदोलन केलं. या कार्यक्रमाला कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे आवर्जून उपस्थित होत्या. नववर्षाचं स्वागत हे नव्या संकल्पनेनं आणि नव्या सवयीनं झालं पाहिजे त्यामुळं युवकांनी व्यसनापासुन दूर राहावं असं आवाहन महापौर अश्विनी रामाणे यांनी यावेळी केलं.