महाराष्ट्रात मार्च महिन्यात अचानक थंडीची लाट

महाराष्ट्रातच्या विविध भागात काल रात्री तापामानात अचनाक मोठी घसरण झालीय.

Updated: Mar 10, 2017, 12:40 PM IST
महाराष्ट्रात मार्च महिन्यात अचानक थंडीची लाट  title=

मुंबई : महाराष्ट्रातच्या विविध भागात काल रात्री तपमानात अचानक मोठी घसरण झालीय.

नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये तर तापमान दहा अंशांच्या खाली गेलंय. निफाडच्या कुंदेवाडीत 9.8 अंश सेल्शियसची नोंद करण्यात आली. 

एकूणच ऐन मार्च महिन्यात पारा घसरल्यानं परिसरातले नागरिक संध्याकाळच्या वेळी सुखद गारवा अनुभवत आहेत. फक्त उत्तर महाराष्ट्रातच नव्हे, पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात एकाच दिवसात मोठे बदल बघायला मिळतोय. 

दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडगार हवा... असंच वातवारण सगळीकडे बघायला मिळतंय. दुपारी चाळीशीच्या आसपास चढणारा पारा रात्री उतरून थेट पंधरा अंशांपर्यंत खाली येतोय. 

तर इकडे मुंबईतही रात्रीचा पारा 20 अंशापर्यंत खाली आलाय. काल सांताक्रुझमध्ये कमाल तापमान 31.5 तर किमान तापमान 20.8 अंश नोंदवण्यात आलंय.