ठाण्याच्‍या प्रस्‍तावित पाणी कपातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

 ठाण्याच्‍या प्रस्‍तावित 40 टक्‍के पाणी कपातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपा शिष्‍टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज घेतली भेट 

Updated: Oct 6, 2015, 06:24 PM IST
ठाण्याच्‍या प्रस्‍तावित  पाणी कपातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती  title=

मुंबई :  ठाण्याच्‍या प्रस्‍तावित 40 टक्‍के पाणी कपातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपा शिष्‍टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज घेतली भेट 

भातसा धरणात पाणीसाठा कमी असल्याने 40 टक्‍के पाणी कपात करण्याचे निर्देश महापालिकेला राज्य  शासनाने दिले होते. आज याबाबत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट  घेतल्यानंतर या प्रस्तावित कपातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  स्थगिती दिली 

मुंबई महापालिकेला  2120 दशलक्ष घनमीटर  आणि ठाणे महापालिकेला 200 दशलक्ष घनमीटर  राज्य  शासनाच्या  भातसा धरणातून पाणीपुरवठा केला जातो.  यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे भातसा धरणात पाणीसाठा कमी असल्याने 40 टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश महापालिकेला  5/9/2015 रोजी  शासनाच्‍या पाणी पुरवठा विभागाने दिले होते.  मात्र  त्यानंतर  झालेल्या  पावसामुळे  धरणात सुमारे  1 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठ्यात  वाढ झाल्यामुळे तसेच ही कपातीची सूचना देण्यापूर्वीच 26/8/2015 पासून मुंबईत महापालिकेने 15 टक्‍के  कपात लागू केली असल्‍यामुळे  या कपातीचा फेर विचार करावा अशी विनंती महापालिकेने शासनाला केली होती.

मात्र  त्याबाबत  निर्णय घेण्यात आला नव्हता. आज आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट  घेऊन याकडे लक्ष वेधले. तसेच 40 टक्‍के  कपात लागू करू नये अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली   त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी   5/9/2015 च्या पत्राला स्थगिती दिली. 

दरम्यान सध्या  मुंबईत 15 टक्‍के पाणी कपात  सुरू असून त्याबाबत पाणी साठ्याचा फेर आढावा घेऊन  पाणी कपातीचा महापालिकेने आपल्या पातळीवर  फेर विचार करावा आणि त्याबाबत राज्य  शासनाला  कळवावे अशी चर्चा या बैठकीत  झाली.

मुख्यमंत्र्यांनी कपातीला स्थगिती  दिल्यामुळे मुंबईकरांना  मोठा दिलासा मिळालाआहे.  त्यामुळे आमदार अॅड आशिष शेलार यांनी  मुख्‍यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.