दोन भावांच्या भांडणात चिमुकल्यानं गमावला जीव

पुणे जिल्ह्यात चाकण जवळ खाळुंबरे गावात जमिनीच्या वादातून एका चिमुकल्याला जीव गमवावा लागलाय. दर्शन शिवाजी बोत्रे असं मरण पावलेल्या चिमुकल्याचं नावं आहे! दर्शनला विहिरीत टाकल्यानं त्याचा मृत्यू झालाय.

Updated: Jun 22, 2016, 09:26 PM IST
दोन भावांच्या भांडणात चिमुकल्यानं गमावला जीव title=

कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यात चाकण जवळ खाळुंबरे गावात जमिनीच्या वादातून एका चिमुकल्याला जीव गमवावा लागलाय. दर्शन शिवाजी बोत्रे असं मरण पावलेल्या चिमुकल्याचं नावं आहे! दर्शनला विहिरीत टाकल्यानं त्याचा मृत्यू झालाय.

दर्शनचे वडील शिवाजी बोत्रे आणि चुलत भाऊ अजित बोत्रे यांच्यात जमिनीवरून वाद होता. काळ संध्याकाळी दोघांमध्ये जमिनीवरून पुन्हा भांडण झालं. त्यावेळी अजित बोत्रे यानं शिवाजी बोत्रे यांच्या पत्नीच्या हातातून दर्शनला हिसकावून घेतलं आणि त्याला जवळच असलेल्या विहिरीत फेकून दिलं त्यातचं त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपी अजित बोत्रे याला अटक केलीय. दोन चुलत भावांच्या भांडणात चिमुकल्याचा जीव गेल्यानं गावावर मात्र शोककळा पसरलीय. चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.