पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला स्टेजवर असलेल्या बाबा बुवांच्या हजेरीबाबत अंनिसच्या हमीद दाभोलकर आणि शैला दाभोलकर यांनी नाराजी व्यक्त केलीय.
ज्या बाबा बुवांवर अंधश्रद्धा पसरविण्याचे गंभीर आरोप आहेत, अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, अशा बाबांचा शासनाने किमान आपल्या स्टेजवरून तरी प्रचार करू नये असे आवाहन हमीद यांनी केलेय.
सरकार नवे असले तरी अपेक्षा जुन्याच असल्याचं मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलय. त्यात काल बाबा बुवांना स्टेजवर पाहून घाबरलो. मात्र तरी आपण आशा ठेवायला हवी, असे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.