या बॅंक मंडळीत उद्धव ठाकरेंची भर पडली - मुख्यमंत्री

काँग्रेसचे राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची एक बँक आहे आणि आता त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे बॅंकेची भर पडलीय. मात्र या बॅंका दिवाळखोरीत निघाल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 15, 2017, 12:39 PM IST
या बॅंक मंडळीत उद्धव ठाकरेंची भर पडली - मुख्यमंत्री  title=

सोलापूर : काँग्रेसचे राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची एक बँक आहे आणि आता त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे बॅंकेची भर पडलीय. मात्र या बॅंका दिवाळखोरीत निघाल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. 

सोलापूरमधील सभेत त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. सोलापूरकरांनी एकाच पक्षाला ४० वर्ष सत्ता दिली. मात्र, त्यांनी जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी जनतेचा विश्वासघातच केल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. 

सोलापूरच्या विकासासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन करत आपण सोलापूरचा विकास करु, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.