जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन

पाकिस्तानातून सुखरुप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाणनं त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं.

Updated: Mar 12, 2017, 05:41 PM IST
जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन title=

धुळे : पाकिस्तानातून सुखरुप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाणनं त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं. यावेळी परिवारातील सदस्य उपस्थित होते. अस्थीपूजन केल्यानंतर नाशिकच्या रामकुंडावर अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे.

अनावधानाने चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये गेला होता. तो पाकिस्तानात गेल्याच्या धक्क्याने त्याच्या आजीचं निधन झालं. यानंतर चंदू जेव्हा पाकिस्तानातून सुटका होऊन घरी परतेल त्याचवेळी त्याच्या आजीच्या अस्थींचं विसर्जन करण्यात येईल असा निर्णय चंदूच्या कुटुंबीयांनी घेतला होता.