'शेतकरी मित्रांनो, मला आत्महत्या करण्यापूर्वी एक फोन करा'

अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. नाना आणि मकरंद यांनी आतापर्यंत ६५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत केली आहे.

Updated: Sep 9, 2015, 08:30 PM IST
'शेतकरी मित्रांनो, मला आत्महत्या करण्यापूर्वी एक फोन करा' title=

औरंगाबाद : अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. नाना आणि मकरंद यांनी आतापर्यंत ६५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत केली आहे.

देणगीदार आणि शेतकरी यांच्यातील आम्ही पोस्टमन आहोत, असं नाना पाटेकर यांनी यापूर्वीचं सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या विधवांना पाहून नाना पाटेकरला अनेक वेळा गहिवरून येतं, यावर बोलतांना नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे, शेतकरी मित्रांनो, आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आणू नका, नाहीतर आत्महत्या करण्यापूर्वी एक तरी फोन मला करा, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

शेतकरी हा अन्नदाता आहे, तो जगला नाही, तर कसं होणार असं सांगून नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना आर्त हाक दिली आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी एक तरी फोन मला करा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.