नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातला आणखी एक चिखलीकर समोर आला आहे. त्याला लाच घेतान पडकल्यानंतर तो कुबरे असल्याचे पुढे आले. संपत्तीची आकडेवारी पाहूण डोळे दीपवून जातील.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतली ३३ लाखांची बँकेतली अनामत रक्कम रिलीज करण्यासठी १ लाख रुपयांची लाच घेताना संजय दशपुतेला रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर समोर आलेली त्याची मालमत्ता थक्क करणारी आहे.
या लाचखोर कार्यकारी अभियंत्याच्या घरून पाच लाख २२ हजार रोख रक्कम, साठ हजारांची चांदीची भांडी, शहरात मोक्याच्या ठिकाणी पत्नी आणि वडिलांच्या नावावर ५ प्लॉट, चार फ्लॅट, बँक लॉकरमध्ये २३ तोळे सोनं, विविध बँकांच्या खात्यात सुमारे २४ लाख ३ हजार रुपये सापडलेत. अजूनही त्याच्या मालमत्तेची मोजणी सुरूच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.