अंबरनाथ : येथील पालिका रुग्णालयातच दोन गटात हाणामारीची घटना घडलीय. पालिकेच्या छाया रुग्णालयात हा प्रकार घडलाय.
चारचाकी गाडीच्या टर्नवरुन झालेल्या वादात हाणामारीचा प्रकार घडला होता. त्या घटनेनंतर बाईकस्वार देवेश मिश्रा आणि चारचाकी चालक अरुण चतुर्वेदी जखमी अवस्थेत रुग्णालयात पोहोचले. मात्र रुग्णालयातही दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये मारहाणीची ही दृष्यं कैद झालीत. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.