उल्हासनगरमध्ये सात उमेदवारांना जीवे मारण्याच्या धमक्या

उल्हासनगर महापालिका निवडणूक लढविणाऱ्या सात उमेदवारांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यात. 

Updated: Feb 9, 2017, 01:37 PM IST
उल्हासनगरमध्ये सात उमेदवारांना जीवे मारण्याच्या धमक्या title=

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणूक लढविणाऱ्या सात उमेदवारांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यात. 

या सर्व उमेदवारांनी पोलीस संरक्षण मिळावे म्हणून ठाणे पोलीस आयुक्तांकडे धाव घेतलीय. पोलीस सुरक्षा मागणाऱ्या उमेदवारांत सर्वात जास्त उमेदवार साई पक्षाचे असून आरपीआई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव आणि ओमी कलानी यांच्या नावाचादेखील समावेश आहे.

दरम्यान, पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी काही उमेदवारांनी पोलीस सुरक्षा मागितली असल्याच्या वृत्तास दुजोरा दिलाय. पोलीस विभाग पोलीस सुरक्षा मागणाऱ्या उमेदवार, त्यांची पार्श्वभूमी आणि खरोखर त्याला धोका आहे का? याचा तपास करून आयुक्त कार्यालयास अहवाल पाठवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.