बुलडाणा: काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असलेला २५० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आलाय. बुलडाणा जिल्ह्यातल्या अमडापूर-जानेफळ मार्गावर हा प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय.
रेशन धान्याचा होतोय काळा बाजार
रेशन माफिया या ट्रकमधून अडीचशे किलो तांदूळ आणि २४ क्विंटल ज्वारी नेत असताना पकडल्यामुळे खळबळ उडालीय. तब्बल ८ लाख ५८ हजारांचा हा माल होता. अमडापूर-जानेफळ मार्गावरच्या एका शेतातल्या गोडाऊनवर धाड टाकल्यानंतर हा काळा बाजार उघड झाला. हा ट्रक गुजरात पासिंगचा असल्यामुळे काळा बाजाराचं हे गुजरात कनेक्शन तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय.
आठवडाभरापूर्वीही मलकापूर इथं अशाच प्रकारे रेशनचा गहू पकडण्यात आला होता. परंतु पोलीस आणि महसूल विभागाच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे याप्रकरणी कुणावरही गुन्हे दाखल झाले नव्हते. त्यामुळे आता अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीच लक्ष घालणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.