ठाणे : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच ते सहा जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अग्निशन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. भिवंडीतील हनुमान टेकडी भागात ही दुर्घटना घडली आहे.
इमारत जुनी असल्याचं सांगण्यात येतंय. धोकादायक इमारत असल्याने रहिवाशांना इमारत खाली करण्यास देखील सांगण्यात आलं होतं. महादेव गुप्ता असं या इमारतीचं नाव आहे.