मुंबई : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात जणांचं पद रद्द झाल्यानंतर महापौरपदासाठी भाजप आता पुन्हा एकदा सज्ज झालंय. महौपारपदासाठी दावा करु असं वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी केलाय.
मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळं जात पडताळणी समितीनं महापौरांसह सात जणांवर ही कारवाई केलीय. यात काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी, भाजप आणि ताराराणी आघाडीचा प्रत्येकी एका सदस्याचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलंय.