भाजप- राष्ट्रवादी साटेलोटे नाही- अजित पवार

भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय... हा आरोप खोटा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. 

Updated: Sep 26, 2014, 01:24 PM IST
भाजप- राष्ट्रवादी साटेलोटे नाही- अजित पवार title=

बारामती : भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय... हा आरोप खोटा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. 

बारामतीमध्ये अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.. त्यावेळी अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय.. आघाडी न होण्याचं खापर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर फोडलंय.. 

मुख्यमंत्र्यांनी आघाडीबाबत चर्चाच होऊ दिली नाही असा आरोप अजित पवारांनी केलाय.. तसंच सरकारचा पाठिंबा काढलाय आता ढवळाढवळ करणार नाही असं अजित पवारांनी म्हटलंय.. 

राष्ट्रवादीची युती कोणाबरोबर आहे हे सर्वांना माहित – फडणवीस 
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचं सांगताना, राष्ट्रवादीची युती कोणाशी आहे हे महाराष्ट्राला माहित असल्याचं सांगत, शिवसेनेला टोला लगावला आहे. 

तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण-पश्चिममधून आपला अर्ज भरणार आहे. 

भाजप-राष्ट्रवादी विचारधारा वेगळी – तारीक अन्वर
राष्ट्रवादी आणि भाजपचं साटंलोटं असल्याचा आरोप माणिकराव ठाकरेंनी केलाय... मात्र राष्ट्रवादी आणि भाजपची विचारधारा वेगळी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी म्हटलंय.. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.