मीरा भाईंदर : गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या पत्नीला गिफ्ट दिलेली ४ कोटीची लॅम्बॉर्गेनी गलार्डो कार सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण आता ही कार वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
नरेंद्र मेहतांनी आपल्या बायकोला दिलेल्या कारचे फोटो व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवर फिरत आहे. पण आज सकाळी मेहतांच्या सुपूत्राने आपल्या शाळेत नेली होती. ती कार एका रिक्षाला ठोकल्याचा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मेहतांच्या मुलाने आज सकाळी आपल्या शाळेत ही गाडी नेली होती. पण ती कंट्रोल न झाल्याने शाळेच्या गेटमधून बाहेर पडताना एसमोर पार्क असलेल्या रिक्षावर जाऊन आदळली. या घटनेचा व्हिडिओ एका मोबाईल धारकाने शूट केला. रिक्षामध्ये कोणी नसल्याने मोठा अपघात वाचला. MH 01 TRD 911 असा या गाडीचा टेंपररी नंबर आहे.
मूळात या गाडीची खरी किंमत १ कोटी ५५ लाख आहे. पण सोशल मीडियावर ४ कोटीच्या गाडी आणि त्याचा प्रताप म्हणून ही गाडी व्हायरल होत आहे.