टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. 

Updated: Mar 27, 2017, 11:12 PM IST
टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! title=

ठाणे : नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं बॅनर ठाण्याच्या नौपाडा परिसरात लागलं आहे. नौपाडा बचाव नागरी कृती समितीनं हे पोस्टर लावलं आहे.

टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक मनी, मॅक्सी, बानी, ब्रुनो आणि मोती अशा आशयाचं हे पोस्टर ठाण्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.