जळगाव : स्मशानभूमीत आणि वाढदिवस...? नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा आला ना..? पण, जळगावातल्या स्मशानभूमीत चक्क सहा वर्षांच्या लहानग्याचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय.
आविष्कार सपकाळे या लहानग्या 'बर्थ डे बॉय'नं स्मशानात आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा केला. स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याची ही राज्यातली बहुधा पहिलीच घटना असावी.
आविष्कारचे वडील विनोद सपकाळे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत. स्मशानभूमी म्हटलं की सर्वात आधी मनात भूतपिशाच्चांची भीती दाटून येते. मात्र, सध्याच्या विज्ञानयुगात लहान मुलांच्या मनातली भूताखेतांची ही भीती नाहीशी व्हावी, या उद्देशानं सपकाळे कुटुंबियांनी हा असा अनोखा वाढदिवसाचं सेलिब्रेशन आयोजित केलं.
आविष्कारच्या वडलांनी स्वतः कॉलेजात असताना अमावास्येच्या दिवशी स्मशानात वाढदिवस साजरा केला होता. आता आपल्या मुलाचा वाढदिवसही स्मशानात साजरा करून त्यांनी नवा पायंडा पाडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.