गोंदिया : शहराच्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या बिंदल थाट हॉटेलला लागलेल्या आगीप्रकरणी अखेर पोलिसांनी संचालकांसह ५ जणांवर गुन्हे दाखल केलेत. या चार मजली हॉटेल ला २१ डिसेंबर ला आग लागली होती.
या भीषण आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. प्रथम दर्शनी हॉटेल्स मध्ये आग विझविण्याबाबत तसेच इतर गैरसोयी देखील प्रशासनाला आढळून आल्या होत्या .मात्र घटना घडल्यानंतर सुद्धा या हॉटेल प्रशासनावर तसेच येथील संचालकांवर कुठलीही कारवाही प्रशासनातर्फे करण्यात आली नव्हती.
राजनैतिक दबावामुळे दोषींवर कारवाई होत नाहीना असा प्रश्न नागरिकांना पडला होता. अखेर बिंदाल थाट हॉटेल्स चा संचालक सह ५ जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आग लागल्यानंतर संगनमत करून पुरावे नष्ट करण्याचा देखील गुन्ह्याचा समावेश असून आरोपीमध्ये राधेश्याम अग्रवाल ,आशिष अग्रवाल ,धीरज अग्रवाल, सुरेंद्र बन्सोड ,लोकेशपुरी वैकुंठी व विश्वजित खोब्रागडे या ६ लोकांचा समावेश आहे.