भूकंपाने नाही भोंगळ कारभाराने पडला रस्त्याला खड्डा

पहा पहा पहा... हा भूकंपाने उद्धवस्त झालेला नेपाळचा रस्ता नाही... हा प्रताप केला आहे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने... भंडारा नागपूर रिंग रोड खचून मोठा खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एका समोर आला आहे. 

Updated: Jul 22, 2015, 08:20 PM IST
भूकंपाने नाही भोंगळ कारभाराने पडला रस्त्याला खड्डा title=

अमित देशपांडे, झी मिडिया, नागपूर : पहा पहा पहा... हा भूकंपाने उद्धवस्त झालेला नेपाळचा रस्ता नाही... हा प्रताप केला आहे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने... भंडारा नागपूर रिंग रोड खचून मोठा खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एका समोर आला आहे. 

भंडारा रिंग रोड अचानक खचल्याने सध्या या रिंग रोडवर मोठी वाहतूक कोंडी होते आहे. रिंगरोड असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते मात्र हा रस्ता खचल्याने सध्या एकेरी वाहतूक सरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते आहे. 

रस्ता खचून २४ तास होत असताना देखील अजून पर्यंत या ची  दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे त्या खाली नाला आहे, त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा काय असेल हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.