रेल्वे रुळाजवळ मोठा खड्डा; मध्य रेल्वे खोळंबली

मध्ये रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झालीय. यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा होतोय. अंबरनाथ ते उल्हासनगरदरम्यान रुळामध्ये खड्डा पडल्यानं अप आणि डाऊनमार्गावरची वाहतूक ठप्प आहे.

Updated: Jun 26, 2015, 10:14 AM IST
रेल्वे रुळाजवळ मोठा खड्डा; मध्य रेल्वे खोळंबली title=

ठाणे : मध्ये रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झालीय. यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा होतोय. अंबरनाथ ते उल्हासनगरदरम्यान रुळामध्ये खड्डा पडल्यानं अप आणि डाऊनमार्गावरची वाहतूक ठप्प आहे.

खड्डा भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक सुरळीत होण्यास आणखी एक ते दीड तास लागण्याची शक्यता आहे.


रेल्वे रुळाजवळ खड्डा

उल्हासनगर रेल्वे स्थानकापासून ५० फूटावर अंबरनाथच्या दिशेला हा खड्डा पडलाय. सुमारे ४ X४ चा हा खड्डा ८ ते १० फूट खोल आहे. गेली चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रुळाखालची माती वाहून गेली त्यामुळे हा खड्डा पडला. 

सकाळी खोपोली लोकलमधल्या एका प्रवाशाने याबाबत उल्हासनगर रेलवस्थानकात माहिती दिली. त्यामुळे खोपोली लोकल उल्हासनगर स्थानकात थांबवण्यात आली. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.