त्र्यंबकेश्वरमधील उत्सवाच्या पर्वावर आंदोलनाचं सावट

दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणा-या त्र्यंबकेश्वरमध्येही भविकांनी गर्दी केलीय. पण उत्सवाच्या या पर्वावर भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाचं सावट आहे. 

Updated: Mar 7, 2016, 01:16 PM IST
त्र्यंबकेश्वरमधील उत्सवाच्या पर्वावर आंदोलनाचं सावट  title=

नाशिक : दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणा-या त्र्यंबकेश्वरमध्येही भविकांनी गर्दी केलीय. पण उत्सवाच्या या पर्वावर भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाचं सावट आहे. 

त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेडनं आज आंदोलनाचा इशारा दिलाय. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बॅरीकेटस लावुन सुरक्षेचे कवच निर्माण करण्यात आलंय.  

भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मंदिराजवळ शिरकाव करता येऊ नये यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केलीये.