शनि शिंगणापूरमध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शनि शिंगणापूर येथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 9, 2017, 10:16 AM IST
शनि शिंगणापूरमध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई  title=

शनि शिंगणापूर : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शनि शिंगणापूर येथे येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. शनि चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते.

आंदोलनानंतर शनि चौथा-यावर महिलांना प्रवेश मिळून १ वर्ष पूर्ण झाल्याने तृप्ती देसाईने शनिदर्शन घेतले.

यावेळी स्त्री-पुरुष समानता यावी तसेच स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात देखील भूमाता ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

'कन्या रत्न जन्मोत्सव जनजागृती अभियान' असे या अभियानाचे नाव असुन संपूर्ण देशात जनजागृती करण्याचा मानस भूमाता ब्रीगेडचा आहे.