पुण्यातील भिडे पुलाला भेगा, वाहतूक बंद

पुराचा तडाखा बसल्यामुळे शहरातील भिडे पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला हा पूल धोकादायक झाला आहे.

Updated: Aug 4, 2016, 04:59 PM IST
पुण्यातील भिडे पुलाला  भेगा, वाहतूक बंद title=

पुणे : पुराचा तडाखा बसल्यामुळे शहरातील भिडे पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला हा पूल धोकादायक झाला आहे.

पूल आणि त्यापुढील रस्ता यामध्ये बारीकशी पोकळी दिसू लागली आहे. त्यामुळे पूर ओसरला तरी त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. असे असले तरी हा पूल पूर्णपणे सुरक्षित असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सलग दोन दिवस जोरदार पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र बुधवारी शहर आणि परिसरात दिसले. जिल्ह्यातील मुठा, मुळा, पवना, नीरा आणि इंद्रायणी या नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 

खडकवासला धरणातून मुठा नदी पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पुण्यातील नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरले. तेथील अडीचशे जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे मदतकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.