भैय्या लांडगे विरुद्ध अजित गव्हाणे, संघर्षाला धार येणार

पिंपरी चिंचवडमध्ये अनपेक्षितपणे भाजप आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन उर्फ भैय्या लांडगे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने सगळ्यांचंच लक्ष भोसरीच्या प्रभाग क्रमांक - 5 मध्ये लागलंय. ही लढत लक्षवेधी ठरणार आहे कारण त्यांची लढत आहे माजी आमदार विलास लांडे यांच्या मेहुणीचा मुलगा असलेल्या अजित गव्हाणे यांच्याशी...

Updated: Feb 8, 2017, 01:32 PM IST
भैय्या लांडगे विरुद्ध अजित गव्हाणे, संघर्षाला धार येणार title=

कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये अनपेक्षितपणे भाजप आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन उर्फ भैय्या लांडगे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने सगळ्यांचंच लक्ष भोसरीच्या प्रभाग क्रमांक - 5 मध्ये लागलंय. ही लढत लक्षवेधी ठरणार आहे कारण त्यांची लढत आहे माजी आमदार विलास लांडे यांच्या मेहुणीचा मुलगा असलेल्या अजित गव्हाणे यांच्याशी...

पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये भाजप आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांचं विळ्याभोपळ्याचं सख्य सर्वांनाच माहिती आहे. आता त्यांच्या या संघर्षाला आणखी धार चढणार आहे. निमित्त आहे भोसरीच्या प्रभाग क्रमांक 5 मधली लढत.

गेली 15 वर्षे या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणे यांना आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन उर्फ भय्या लांडगे यांनी आव्हान दिलंय. अजित गव्हाणे हे लांडे यांचे कट्टर समर्थक आणि नातेवाईक आहेत. त्यामुळे हे लढत आता प्रतिष्ठेची झालीय. 

भोसरी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या जास्तीत जास्त जागा जिंकत विधानसभेत झालेला भाजपचा विजय हा अपघात नाही हे महेश लांडगे यांना सिद्ध करायचं आहे. तर विलास लांडे यांना आपला बालेकिल्ला पुन्हा मजबूत करायचा आहे. त्यामुळे या दोघांमध्ये संघर्ष सुरू झालाय. त्यातच आता दोघांचे नातेवाईक समोर आल्याने संघर्ष अटळ आहे.