एक अनोखं लग्न.. स्मशानभूमीत झालं शुभमंगल सावधान...

एखाद्या माणसानं इहलोकीचा प्रवास संपवला की, त्याला अखेरचा निरोप दिला जातो तो स्मशानभूमीत... तिथलं वातावरणच एकदम धीरगंभीर आणि चिडीचूप शांतता असलेलं... मात्र त्याच स्मशानभूमीत अचानक सनईचे सूर ऐकू आले तर... पाहूयात, हा खास रिपोर्ट...

Updated: Dec 29, 2015, 08:22 PM IST
एक अनोखं लग्न.. स्मशानभूमीत झालं शुभमंगल सावधान...  title=

लक्ष्मीकांत रूईकर, झी मीडिया, बीड : एखाद्या माणसानं इहलोकीचा प्रवास संपवला की, त्याला अखेरचा निरोप दिला जातो तो स्मशानभूमीत... तिथलं वातावरणच एकदम धीरगंभीर आणि चिडीचूप शांतता असलेलं... मात्र त्याच स्मशानभूमीत अचानक सनईचे सूर ऐकू आले तर... पाहूयात, हा खास रिपोर्ट...

सनईचे हे मंजूळ सूर... हा भव्य सजवलेला मंडप... जिलेबी, भजीपु-या असा गोडधोड पक्वान्नांचा बेत... बीड शहरातल्या अमरधाम स्मशानभूमीतलं हे चित्र... होय, ही स्मशानभूमीच आहे आणि तिथूनच आज हे सनईचे सूर कानी पडत होते. जिथं माणसाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार पार पडतात, तिथंच मंगळवारी चक्क विवाहाचा मंगल सोहळा संपन्न झाला.

याच स्मशानभूमीत राहणा-या गायकवाड कुटुंबातली रेणुका... आणि नगरच्या स्मशानभूमीत राहणारा गंगाराम जाधव... मनसजोगी समाजातल्या या वधूवरांचं देवाब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न झालं ते स्मशानभूमीतच...

स्मशान हीच ज्याची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे, त्यानं तिथंच लग्नाचा सोहळा उरकला तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण काय?

स्मशानभूमीत लग्न करण्याच्या या कल्पनेचं समाजातूनही स्वागत होतंय.

जिथं माणसाचा प्रवास संपतो, तिथूनच रेणुका आणि गंगारामनं आपला संसार सुरू केला. स्मशानभूमीत झालेलं हे अनोखं लग्न... त्यामुळं बीडमध्येच काय, अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा तर होणारच...