उर्दू कवितेचं नुकसान, शायर बशर नवाज यांचं निधन

'करोगे याद तो हर बात याद आयेगी...' सारखी अजरामर गजल आणि हृदयाचा ठाव घेणारे शेर शब्दबद्ध करणारे ख्यातनाम शायर बशर नवाज यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. 

Updated: Jul 9, 2015, 09:23 PM IST
उर्दू कवितेचं नुकसान, शायर बशर नवाज यांचं निधन title=

औरंगाबाद: 'करोगे याद तो हर बात याद आयेगी...' सारखी अजरामर गजल आणि हृदयाचा ठाव घेणारे शेर शब्दबद्ध करणारे ख्यातनाम शायर बशर नवाज यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. 

औरंगाबादमध्ये आपल्या राहत्या घरी पहाटे पाच वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज सायंकाळी त्यांचा दफनविधी झाला. बशर नवाज यांनी बाजार, लोरी, जाने वफा, तेरे शहर मे या हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखनही केलं. 

लता मंगेशकर, आशा भोसले, मोहंमद रफी, मेहंदी हसन, गुलाम अली, तलत अजीज, भुपेंद्र या मातब्बर गायकांनी त्यांच्या गझलांना आपला आवाज दिला.

शायर बशर नवाज यांच्या जीवनपटावर एक नजर टाकूयात...

- बशर नवाज यांचा जन्म १९३५ साली औरंगाबादमध्ये झाला. 
- त्यांनी १९५४ ला अखिल भारतीय मुशायऱ्यात पहिली गझल सादर केली.
- १९७१ साली प्रकाशित झालेला रायगाँ हा पहिला गझल संग्रह चांगलाच गाजला. 
- त्यानंतर अजनबी समंदर, करोगे याद तो आणि मुझे जीना नही या गजलसंग्रहांनी रसिकांना मोहिनी घातली.

बशर नवाज यांचं 'बाजार' सिनेमातलं 'करोगे याद तो हर बात याद आएगी' ही गझल आजही रसिकांच्या हृदयात घर करून आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.