EXCLUSIVE:हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात जातंय स्लो पॉयझन

तुमच्या आमच्या आरोग्याविषयी एक महत्त्वाची आहे. हिरव्यागार दिसणाऱ्या भाज्या तुम्ही मोठ्या चवीनं खात असाल... पण याच हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात स्लो पॉयझन जात असल्याचं सांगितलं तर... धक्का बसला ना...पण हो हे खरंय... शिळ्या भाज्या क्लोरोपायरिफास कीटक नाशकाच्या माध्यमातून कशा ताज्या केल्या जातात, त्याचा झी मीडियानं पर्दाफाश केलाय. तुम्हीच पहा नेमका हा गोरखधंदा कसा सुरू आहे ते. 

Updated: Jul 9, 2015, 09:06 PM IST
EXCLUSIVE:हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात जातंय स्लो पॉयझन  title=

माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया: तुमच्या आमच्या आरोग्याविषयी एक महत्त्वाची आहे. हिरव्यागार दिसणाऱ्या भाज्या तुम्ही मोठ्या चवीनं खात असाल... पण याच हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात स्लो पॉयझन जात असल्याचं सांगितलं तर... धक्का बसला ना...पण हो हे खरंय... शिळ्या भाज्या क्लोरोपायरिफास कीटक नाशकाच्या माध्यमातून कशा ताज्या केल्या जातात, त्याचा झी मीडियानं पर्दाफाश केलाय. तुम्हीच पहा नेमका हा गोरखधंदा कसा सुरू आहे ते. 

हिरव्या रंगाचं क्लोरोपायरिफास कीटक नाशक पाण्यात मिसळतात... आणि त्याच द्रावणात शिळ्या भाज्या बुडवून बाहेर काढतात... या द्रावणाचा फायदा असा की शिळ्या भाज्या चक्क ताज्यातवान्या वाटतात...

पाहा टोमॅटो काही तासांतच कसे लाल होतात आणि कच्ची केळी कशाप्रकारे पिकवतात... लाल रंगाचं इथिलिन कीटकनाशकाद्वारे हे विक्रेते हे शक्य करतात आणि विक्रीसाठी नेतात.

हा सगळ्या प्रकारापासून ग्राहक मात्र अनभिज्ञ असतात... त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. 

अशा भाज्या माणसाच्या पोटात गेल्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसत असल्याचं डॉक्टर सांगतात.

गोंदियात गेल्या काही दिवसांपासून हा गोरखधंदा सुरूय... मात्र त्याकडे ना एफडीआयचं लक्ष आहे ना आरोग्य विभागाचं... ग्राहक संघटनाही मूग गिळून गप्प बसल्यायत... एकीकडे मॅगीवर कारवाई होते... पण अशा अशास्त्रीय पद्धतीनं पिकवेलल्या आणि ताज्यातवान्या केलेल्या भाज्यांचं काय असा सवाल उपस्थित होतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.