सातारा : साताऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सलमानच्या पोस्टरला काळं फासलं आहे. तसेच राजलक्ष्मी थिएटरचा बजरंगी भाईजानचा शो बंद पाडला आहे.
याकूब मेमन नव्हे, तर टायगर मेमनला फाशी देण्याची मागणी करणारे सलमानने मध्यरात्री ट्वीट्स केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
सलमान खानने मध्यरात्री याकूब मेमनच्या समर्थन करणारे १४ ट्वीट्स पोस्ट केले होते. शिवसैनिकांनी या ट्वीट्स विरोधात आंदोलन केलं आहे.
साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन छेडलं आहे. यावेळी सलमान खानच्या पोस्टरला शिवसैनिकांनी काळं फासलं. शिवाय, ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाचा शो बंद पाडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.