नाशिक कारागृहातले भाई जामिनावर बाहेर

खून, दरोडे, खंडणी, प्राणघातक हल्ला अशा गंभीर गुन्ह्यात नाशिक कारागृहात असलेले भाई जामिनावर बाहेर सुटलेत

Updated: Jan 20, 2017, 09:06 PM IST
नाशिक कारागृहातले भाई जामिनावर बाहेर  title=

नाशिक : खून, दरोडे, खंडणी, प्राणघातक हल्ला अशा गंभीर गुन्ह्यात नाशिक कारागृहात असलेले भाई जामिनावर बाहेर सुटलेत. गेल्या दोन महिन्यात 189 तर सहा महिन्यात हाच आकडा 579 इतका आहे. आगामी महापालिका निवडणुकीकच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या गुन्हेगारांची जामिनावर मुक्तता करून आणल्याची शहरात चर्चा आहे.

न्यायालयात आपली बाजू मांडण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा ठपका देखील ठेवला जातोय. नाशिक पोलीस एकीकडे संशयित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करतायय, तर दूसरीकडे सराईत गुन्हेगार कारागृहाच्या बाहेर पडत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना मात्र गावगुंडांच्या दहशतखाली राहावं लागणार आहे. निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारांकडून साम दाम दंड भेद नितीचा वापर केला जाणार हे यामुळं स्पष्ट झाल्याचं मानलं जातंय. त्यामुळे निर्भय वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी पोलीस काय पावलं उचलतात याकडे लक्ष लागलय.