बंदुकीचा धाक दाखवून पुण्यात दरोडा

पुण्यातील वाघोली येथील बगाडे ज्वेलर्सवर बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला.

Updated: May 2, 2017, 07:19 PM IST
बंदुकीचा धाक दाखवून पुण्यात दरोडा title=

पुणे : पुण्यातील वाघोली येथील बगाडे ज्वेलर्सवर बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यावेळी दुकानातील महिला कामगाराने प्रसंगावधान दाखवत सायरन वाजवला खरा, मात्र गोंधळलेल्या दरोडेखोरांनी हातात लागेल तितकं सोन्याचे दागिने घेऊन तेथून पळ काढला.

या दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न एका कामगाराने केला मात्र त्याच्यावर गोळ्या झाडून दरोडेखोर पसार झाले. जखमी कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.