बदलापूर : १५ मार्च रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत जगत साही याचा मृतदेह शीर वेगळे केलेल्या छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. हत्येच्या काही तासातच राजेशकुमार नेपाळी याला पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली होती.
तपासात आरोपीने ही हत्या त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंधातून केल्याची कबुली दिली. मृत जगत साही आणि आरोपी राजेशकुमार नेपाळी हे नेपाळमधील दहीलेक या जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
हे दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. मात्र मृत जगत साही काही कामानिमित्त बदलापूर येथे आला. रात्री दारूच्या नशेत नेपाळ येथे डीला नावाच्या एका महिलेशी अनैतिक संबंध असून माझ्यापासून तिला एक मुल झाल्याचे सांगितले. मात्र त्याने वर्णन केलेली महिला दुसरी तिसरी कोण नसून आपली पत्नी असल्याचं राजेश नेपाळीच्या लक्षात आलं आणि त्या रागातून हत्या केल्याचं राजेश नेपाळीनं कबूल केलं.