तलावातील खराब पाण्यामुळे शाळेत पटसंख्या घटली

 शाळेला लागून असलेल्या रामाळा तलावाच्या दुर्गंधीमुळे वर्गातील मुलींना उलट्या आणि मळमळीचा त्रास होतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 26, 2017, 07:38 PM IST
तलावातील खराब पाण्यामुळे शाळेत पटसंख्या घटली title=

चंद्रपूर : शहरातील प्रियदर्शनी कन्या शाळेतील विद्यार्थी सध्या एका विचित्र त्रासामुळे त्रस्त आहेत. शाळेला लागून असलेल्या रामाळा तलावाच्या दुर्गंधीमुळे वर्गातील मुलींना उलट्या आणि मळमळीचा त्रास होतो. ज्यामुळे शाळेची पटसंख्या कमालीची घसरली आहे. प्रिंयदर्शनी कन्या शाळेला हा दुर्गंधीचा त्रास गेल्या ६ महिन्यांपासून होतोय. 

मात्र आता उन्हाळ्यात तलावातील पाणी आटल्याने हा वास अतिशय उग्र झालाय. हा त्रास सहन करण्याच्या पलीकडे झाल्यावर शाळेनं चंद्र्पुर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पत्र पाठवून याची रीतसर तक्रार केली. मात्र महानगरपालिकेने या तलावाची स्वच्छता आपली जबाबदारी नसल्याचं सांगत तक्रारीचं पत्र स्वीकारण्यास देखील नकार दिला.