पुणे : पुण्यातील मंचर येथे भाग्यलक्ष्मी नावाची दूध डेअरी आहे. या डेअरीमधलं दूध हे अंबानी परिवार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या सारख्या मोठ्या हस्तींच्या घरी पोहोचतं. २७ एकरमध्ये पसरलेल्या या दूध डेअरीमध्ये एकूण ३५०० गाई आणि ७५ कर्मचारी आहेत. एकूण १२००० लोकांच्या घरी या डेअरीचं दूध पोहोचतं. या दूधाची किंमत आहे ८० रुपये लीटर.
डेअरीचे मालक देवेंद्र शाह यांनी कपड्याचा बिझनेस सोडून दुधाचा धंदा सुरु केला. 'प्राइड ऑफ काऊ' प्रोडक्ट सुरुवातीला १७५ कस्टमर्स वापरत होते. पण आता संपूर्ण पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये त्यांचे १२००० कस्टमर्स आहे.
गाईंना मिळणाऱ्या सुविधा
- येथे गाईंना पिण्यासाठी फिल्टर पाणी दिलं जातं.
- येथे वेगवेगळ्या वातावरणानुसार गाईंना डॉक्टर डाईट केलं जातं.
- दूध काढतांना जर्मन मशीनने गाईचं मसाज होतो.
- गाईंसाठी जमीनवर टाकलेल्या रबर मॅट दिवसातून ३ वेळा स्वच्छ केलं जातं.
डेअरीबाबत काही अनोख्या गोष्टी
- या डेअरीमध्ये दिवसाला ५४ लीटर दूध देणारी देखील गाई आहे.
- जुन्या कस्टमरने रेफरंस दिलं तरच नवीन कस्टमर
- दरवर्षी हजार पर्यटक येथे भेट देतात.
- दूध काढण्यापासून पॅकिंगपर्यंत दुधाला माणसाच्या हाताचा स्पर्श होत नाही.
- गाईचं दूध काढण्यापूर्वी तिचं वजन आणि तापमान तपासलं जातं.
- ७ मिनिटात ५० गाईंचं दूध काढलं जातं.