कल्याण: शहरातील रिक्षाचालकांच्या मुजोरीचे प्रकरणं नेहमीच पुढे येत असतात. अशीच एक घटना पुन्हा कल्याणमध्ये घडलीय. कारला धडक मारल्याचा जाब वितारला म्हणून एका शिक्षिकेला रिक्षाचालकानं मारहाण केल्याची घटना घडलीय.
यावेळी मध्यस्थी करणाऱ्या तरुणालाही त्यानं बेदम मारहाण केलीय. बुधवारी सकाळी ही घटना घडलीय. या प्रकरणी दोघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं अमित ताडीवाल आणि राजेश ताडीवाल आहे.
आणखी वाचा - 'एचआयव्ही' बाधित असूनही रिक्षाचालकानं जोडले 300 महिलांशी संबंध
ऋतिका राणे या शिक्षिका आहेत. दसरा पूजनाच्या तयारीसाठी त्या कार घेऊन बाजारात निघाल्या होत्या. कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजारात त्या थांबल्या. आपल्या कारचा दरवाजा उघडून उतरत असतांना मागून येणाऱ्या रिक्षानं त्यांना धडक दिली. याचा जाब विचारायला राणे पुढे आल्या.
त्यांच्यात वादावादी सुरू झाली आणि क्लिपीर नाक्यावरील पोलीस चौकीकडे त्यांनी धाव घेतली. तेव्हा रिक्षाचालकानं आपल्या साथीदारांना बोलवलं आणि राणे यांना मारहाण केली. त्यांच्या मदतीला अपूर्ण शहाणे नावाचा तरुण धावला तर त्यालाही रिक्षाचालकांनी मारहाण केली. रस्त्यावर महिला सुरक्षित नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया राणे यांनी दिलीय.
आणखी वाचा - एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.